येवला (नाशिक) - 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरीता अनेक कलाकार तसेच राज्य सरकारने पाठपुरावा करून देखील अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नाही. गेल्या सात वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा भारत सरकारकडून मिळाला नाही. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ केली आहे.
सात वर्षे झाली मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे. अभिजात भाषेसाठी ज्या ज्या अटी असतात त्या मराठी भाषेने पूर्ण केले आहे. जुने प्राचीन भाषा असावी, समृद्ध वाड्मय आहे, ती कुठल्याही भाषेची उपभाषा नसावी, या तिन्ही गोष्टी मराठी भाषेने पूर्ण केलेले आहे. रंगनाथ पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हरी नरके आणि इतर सगळ्याच अभ्यासकांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून हे पटवून दिले. दोन अडीच हजार वर्षांपूर्वी शिलालेखावर सुद्धा मराठी नाव सापडत आहे, असेही भुजबळ म्हणाले.
'अनेक राज्यांना अभिजात भाषा दर्जा'