नाशिक - राजे सर्व जनतेचे असतात, कोण्या एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर ओबीसीवर करतात की, अजून कोणावर ते बघावे लागेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच मराठा आरक्षणामुळे सुरू असलेले शाब्दिक वाद आता थांबायला हवा, असे मतही भुजबळांनी व्यक्त केले आहे.
'संभाजीराजे तलवारीचा वापर कोणावर करतात बघावे लागेल'
राजे सर्व जनतेचे असतात, कोण्या एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर ओबीसीवर करतात की, अजून कोणावर ते बघावे लागेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
एमपीएससी परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर जास्त काही बोलता येणार नाही. पण, परीक्षा व्हायला पाहिजे होती, असे काही जणांचे मत होते. कांदा निर्यातीबाबत महाराष्ट्राशी दुजाभाव का, याबाबत आम्ही केंद्राला जाब विचारू, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील कांद्याच्या निर्यातीस परवानगी द्यावी, ही आमची मागणी आहे, असे सांगतानाच भुजबळ म्हणाले, एचएलल हेरगिरी प्रकरणावर पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली. यावर पोलीस आपले काम करत आहेत.
हेही वाचा -'नाशकातील हाॅटेल, रेस्टारंट अन् बार रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार'