नाशिक- भाजप आयटी सेलचे ( BJP IT Cell ) प्रमुख गजारिआ यांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दानंतर ( Offensive Tweet against Rashmi Thackeray ) राजकीय वातावरण तापले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांना खडेबोल सुनावत ही भारतीय संस्कृती नसून महिलांबाबत बोलताना काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
प्रत्येक व्यक्तीची सुरक्षाची जवाबदारी आमची
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.8 जानेवारी) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गजारिआ यांनी रश्मी ठाकरेंना राबडी देवीची ( Rabri Devi ) उपमा दिली होती. त्यानंतर मोठा गदारोळ माजला व संबंधितावर गुन्हा दाखल झाला. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. कुणाबद्दलही अपमानास्पद बोलू नये. बोलताना ती काळजी घ्यावी. महिलांच्या संदर्भात तर बोलताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. नागपूर येथील संघ मुख्यालयाची रेकी करणार्या पाकिस्तानी हेरला ताब्यात घेतल्याबाबत बोलताना संघ मुख्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीची सुरक्षाची जवाबदारी आमची आहे, असे भुजबळ यानी सांगितले आहे.