महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदारसंघातील रस्ते पुन्हा गुळगुळीत होणार - छगन भुजबळ - राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते

मागील काळात जिल्हाभरातील विकासाची गती खंडित झाली आहे. त्यामुळे पुन्हा त्याच गतीने येवला मतदारसंघासह जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी शासनाला प्रशासनाची साथ असणे आवश्यक आहे. येवला मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून सर्व माहिती संकलित करून रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावी. रखडलेल्या कामांना गती देण्यात यावी, असे आदेश मंत्री भुजबळ यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

छगन भुजबळ - राष्ट्रवादी नेते
छगन भुजबळ - राष्ट्रवादी नेते

By

Published : Dec 11, 2019, 10:15 AM IST

Updated : Dec 11, 2019, 12:19 PM IST

नाशिक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मतदारसंघाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. येवला मतदारसंघातील रस्ते पुन्हा गुळगुळीत होतील असे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले आहे. तसेच खंडित विकासाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केले आहे. येवला संपर्क कार्यालय येथे येवला मतदारसंघ व जिल्ह्यातील विकासकामाबाबत मंगळवारी त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सर्व खातेप्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला.

मतदारसंघातील रस्ते पुन्हा गुळगुळीत होणार - छगन भुजबळ
भुजबळ म्हणाले, मागील काळात जिल्हाभरातील विकासाची गती खंडित झाली आहे. त्यामुळे पुन्हा त्याच गतीने येवला मतदारसंघासह जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी शासनाला प्रशासनाची साथ असणे आवश्यक आहे. येवला मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून सर्व माहिती संकलित करून रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावी. रखडलेल्या कामांना गती देण्यात यावी, असे आदेश मंत्री भुजबळ यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Last Updated : Dec 11, 2019, 12:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details