महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एखाद्या नेत्याची भाटगिरी किती करावी याचे भान ठेवायला हवे' - छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद जातिभेद केला नाही, त्यांच्याकडे काम करणाऱ्या सेनापतीमध्ये मुस्लीम सेनापतींची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असताना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा नये, अशी व्यवस्था होती. आज मात्र मोदी सरकारकडून सर्वच व्यवस्था पायदळी तुडवल्या जात आहेत.

छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री
छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री

By

Published : Jan 13, 2020, 4:38 PM IST

Updated : Jan 13, 2020, 8:05 PM IST

नाशिक- यापूर्वी देशात काहींची तुलना कधी प्रभुरामचंद्र तर कधी शिवशंभू बरोबर केली गेली. त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल, तर जनता कदापी सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भाजप नेते गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित केले आहे, त्यावर भुजबळांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली.

छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

भुजबळ म्हणाले, कुठल्याही लेखकाने भाटगिरी तरी किती करावी आणि ती करत असताना आपण कुठल्या व्यक्तीची तुलना कोणाशी करत आहोत, याचेही भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रश्नांवर तसेच पुस्तकांवर बंदी घातलीच पाहिजे, असे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद जातीभेद केला नाही, त्यांच्याकडे काम करणाऱ्या सेनापतीमध्ये मुस्लीम सेनापतींची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असताना शेतकऱ्यांच्या काडील देखील हात लावता कामा नये, अशी व्यवस्था केली होती. आज मात्र मोदी सरकारकडून सर्वच व्यवस्था पायदळी तुडवल्या जात आहेत. राज्य ते ज्या प्रकारे कायदे करत आहेत, त्यात जनहित नसून कुठलीतरी एक विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे.

देशात विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे, जेएनयू सारख्या देशाच्या नामांकित विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेत, असे कधीही घडलं नाही. त्यांचे राज्य हे रयतेच राज्य होते, त्यांच्या नावावर निवडणुकीत मते मागितली गेली. त्यामुळे जनतेत रोष असणे सहाजिकच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणे शक्य नसल्याची टीका भुजबळ यांनी केली.

Last Updated : Jan 13, 2020, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details