नाशिक - दिंडोरी तालुक्यातील ननाशी परिसरात आणि पेठ तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी नोंदवली गेली. शुक्रवारी सकाळी अकरावाजेच्या सुमारास नागरिकांना धक्के जाणवले, अशी माहिती दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी दिली.
दिंडोरी व पेठ तालुक्याला सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - दिंडोरी सौम्य भूकंप न्यूज
दिंडोरी तालुक्यातील ननाशी परिसरातील काही गावे आणि पेठ तालुक्यातील जोगमोडी, आसरबारी आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन जमीन हादरल्याचे काही नागरिकांना जाणवले. या प्रकाराने परिसरात घबराट निर्माण झाली होती. नाशिकच्या मेरी येथील भूकंप आधार सामुग्री पृथक्करण कक्षाकडे या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी नोंदवली गेली.
दिंडोरी तालुक्यातील ननाशी परिसरातील काही गावे आणि पेठ तालुक्यातील जोगमोडी, आसरबारी आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन जमीन हादरल्याचे काही नागरिकांना जाणवले. या प्रकाराने परिसरात घबराट निर्माण झाली होती. नाशिकच्या मेरी येथील भूकंप आधार सामुग्री पृथक्करण कक्षाकडे या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र दिंडोरी तालुक्यातील ननाशी व पेठ तालुक्यातील जोगमोडी या गावांजवळ आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
या परिसरात गेल्या काही वर्षांपासून भूगर्भातून विविध आवाज येण्याच्या, हादरे बसण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे सावट कायम असते. भुकंपाच्या सततच्या सौम्य धक्क्यांमुळे आणि पुरेशा माहिती अभावी या परिसरातील नागरिक तत्काळ भयभीत आणि संभ्रमित होतात. कारण ननाशी परिसर हा आदिवासी बहुल भाग आहे. प्रशासनाच्यावतीने या नागरिकांना मार्गदर्शन आणि जनजागृती होणे आवश्यक आहे.