नाशिक- देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. 40 दिवसांपेक्षा अधिक लाॅकडाऊन असल्याने मजुरांनाचा धीर सुटत आहे. त्यामुळे मुंबई येथील परप्रांतीय मजुरांनी मिळेल त्या वाहनाने, पायपीट करीत घरचा रस्ता धरला आहे. अशात मुंबईच्या डोंबिवली येथे कामसाठी असलेल्या मजुरांनी सायकल विकत घेऊन मुंबई ते पश्चिम बंगाल असा प्रवास सुरू केला आहे.
तळपत्या उन्हात मुंबई ते पश्चिम बंगाल 1800 किमी सायकलने प्रवास... हेही वाचा-केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
कामाच्या शोधात देशभरातील मजूर राज्यात कामाला येतात. मुंबई, पुण्यात अशा मजुरांची संख्या अधिक आहे. देशात कोरोना आला आणि देश लाॅकडाऊन झाला. उद्योग धंदे बंद पडले. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. सरकारने, सामाजिक संस्थेने पुढाकार घेत अशा मजुरांची खाण्या-पिण्याची सोय केली. मात्र, काम नाही, सर्व काही बंद त्यामुळे मजुरांचा शहरात जीव गुदमरल्या सारखा झाला. घरची ओढ लागल्याने जीवाची पर्वा न करता मजुरांनी घराचा रस्ता पकडला.
पश्चिम बंगाल येथून मुंबईच्या डोंबिलीत काम करण्यासाठी आलेल्या मजुरांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी जाण्यासाठी कोणतेही प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने या मजुरांनी उपाशी राहून पैशातून सायकल विकत घेतली. आणि गावाकडचा रस्ता पकडला. मुंबई ते पश्चिम बंगाल असा 1 हजार 800 किलोमीटरचा प्रवास मुरांना तळपत्या उन्हात करायचा आहे. त्यासाठी 12 ते 15 दिवसांचा प्रवास त्यांना करावा लागणार असल्याचे या मजुरांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.