नाशिक -मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती. आर्मी एव्हिएशन स्कूलच्या दीक्षांत सोहळ्याला याचा फटका बसला. वातावरणात व्हीजीबिलिटी नसल्याने हेलिकॉप्टर प्रात्यक्षिकांवर याचा परिमाण झाला. रस्त्याने वाहने चालवताना देखील वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
नाशिकवर पसरली धुक्याची चादर; तापमानात सातत्याने घट
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. शुक्रवारी देखील 12.6 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर घेताना घेत आहेत मात्र, त्या सोबतच दाट धुक्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नाशिकवर धुक्याची चादर
हेही वाचा - गोदावरीमधील काँक्रीटीकरण काढण्यास सुरुवात; याचिकाकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. शुक्रवारी देखील 12.6 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर घेत आहेत. मात्र, त्या सोबतच दाट धुक्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर्षी नाशिकमध्ये थंडीचे आगमन उशीरा झाले. त्यामुळे पुढील काही काळ अधिक थंडी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.