नाशिक -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे जाहीर केले. संकेतस्थळावर अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक अपलोड करत १६ जुलै पासून योग्य ती काळजी घेत परीक्षा घेण्याची तयारी केली. मात्र, या सगळ्या परीक्षा प्रक्रियेला मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला असून परीक्षा घेण्याच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी; मात्र विद्यार्थ्यांचा विरोध - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अंतीम वर्षाच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहिर केले. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्रातील लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा १६ जुलै पासून घेण्यात येणार आहेत.या सगळ्या प्रक्रियेवर मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. कोरोनाच्या काळात इतर परीक्षा रद्द केल्या जात असताना मेडकलच्याच विद्यार्थ्यांबाबत दुजाभाव का? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. आमच्याच जीवाशी नाहीतर आमच्या लाखो विद्यार्थ्यांच्या पालकांच्या जीवाशी विद्यापीठ खेळ खेळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अंतीम वर्षाच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर केले. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्रातील लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा १६ जुलै पासून घेण्यात येणार आहेत. केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशान्वये आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार या परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. परीक्षार्थी विद्यार्थी आणि संलग्नीत महाविद्यालयाच्या सोईसाठी या सर्व परीक्षा टप्प्या-टप्प्याने आणि विद्यार्थी ज्या-ज्या महाविद्यालयात प्रवेशित आहेत. त्या महाविद्यालयातच परीक्षा घेण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अनावश्यक प्रवास टाळून आपल्या सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेची तयारी करावी. बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, वसतिगृह प्रमुखांच्या परवानगीशिवाय महाविद्यालय, वसतिगृहात येऊ नये. शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विद्यापीठाने केले आहे.
या सगळ्या प्रक्रियेवर मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. कोरोनाच्या काळात इतर परीक्षा रद्द केल्या जात असताना मेडकलच्याच विद्यार्थ्यांबाबत दुजाभाव का? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. आमच्याच जीवाशी नाहीतर आमच्या लाखो विद्यार्थ्यांच्या पालकांच्या जीवाशी विद्यापीठ खेळ खेळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांची आणि विद्यापीठाची भूमिका पाहता हा विरोध अधिक टोकाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल यांनी विद्यापीठ प्रमुख आणि सरकारसह विद्यापीठाने परीक्षाबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी अधिकच आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत लवकरच सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे.