नाशिक- गेली दोन महिने उलटूनही अजून राज्यातील एमबीएच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आता नाराजीचा सूर उमटत आहे. प्रवेश प्रक्रिया रखडल्याने हजारो मुलांचे नुकसान होऊ शकते तरीही अजूनही सरकारी यंत्रणेला जाग आलेली नाही. त्यामुळे सरकारच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये एमबीएच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.
राज्यातील 'एमबीए'च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले, संतप्त विद्यार्थ्यांचे नाशिकमध्ये निषेध आंदोलन - प्रवेश रखडले
प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने तब्बल 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. बाकी कॉलेज सुरू असून एमबीएचेच प्रवेश का रखडले गेलेत हा प्रश्न आता विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहचे. तसेच संबंधित निष्काळजी अधिकारी आणि जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घ्यावेत, अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत.
प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने तब्बल 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. बाकी कॉलेज सुरू असून एमबीएचेच प्रवेश का रखडले गेलेत हा प्रश्न आता विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहचे. तसेच संबंधित निष्काळजी अधिकारी आणि जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घ्यावेत, अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत. यासंदर्भात आज नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
बनावट गुणांसह अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेली करण्यात आली आहे.