महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रमजान काळातदेखील नमाज घरीच अदा करा - मौलाना अस्लम रिझवी - news about ramajan

देशातील कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता सर्वच मशिदी बंद करण्यात आल्या असून सर्वानी आपापल्या घरीच नमाज अदा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Maulana appealed to perform Namaz at home during ramajan
रमजान काळात देखील नमाज घरीच अदा करा - मौलाना अस्लम रिझवी

By

Published : Apr 24, 2020, 7:35 PM IST

नाशिक (मनमाड) -मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात नमाजसह सर्व धार्मिक विधींसाठी मशिदीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व धार्मिक विधी घरातच करण्याचे आवाहन, मनमाडमधील मौलानांनी केले आहे.

रमजान काळात देखील नमाज घरीच अदा करा - मौलाना अस्लम रिझवी

जगभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ताने महिनाभर रोजे (उपवास) धरण्याची पद्धत आहे. या महिन्यात तरावीची विशेष नमाजदेखील अदा केली जाते. मात्र, देशातील कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता सर्वच मशिदी बंद करण्यात आल्या असून सर्वानी आपापल्या घरीच नमाज अदा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. रमजान निमित्त काही विशेष सूट आहे का, अशी विचारणा होत होती. यामुळे सर्व मशिदींच्या मौलानांनी बैठक घेऊन प्रशासनासला सहकार्य करण्याच्या हेतूने रमजानच्या काळातदेखील मशीद बंदच असतील. कोणीही घराबाहेर पडू नये व प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन केले आहे. यामुळे जोपर्यंत देशावरील संकट टळत नाही, तोपर्यंत मशिदीमध्ये नमाज होणार नाही.

रमजान काळात देखील नमाज घरीच अदा करा - मौलाना अस्लम रिझवी

यंदा कोरोनाचा राक्षस आपल्या भोवती घिरट्या घालत असून आपण या राक्षसाला हरवू, असे सर्वांनी ठामपणे मनाशी ठरवले आहे. त्यामुळे यावर्षी कुठलाही गाजावाजा न करता रमजान ईद आणि ईदच्या महिन्यात असलेला विशेष नमाज घरीच अदा करण्यास मुस्लीम बांधवांनी संमती दर्शवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details