महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माथाडींच्या संपाला येवला, लासलगावात चांगला प्रतिसाद; संपामुळे कांदा उत्पादक अडचणीत - कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने त्यांच्या विविध प्रलंबित 16 मागण्यांसाठी बुधवारी पुकारलेल्या राज्यव्यापी एक दिवसीय संपाला लासलगाव, येवला मनमाडसह नाशिक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव या संपामुळे बंद आहेत.

nashik
माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपाला येवला, लासलगावात चांगला प्रतिसाद; संपामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

By

Published : Feb 26, 2020, 2:47 PM IST

नाशिक - माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपाला येवला आणि लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. माथाडी कामगारांच्या संपामुळे सर्वच बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव बंद. त्यामुळे या संपाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.

माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपाला येवला, लासलगावात चांगला प्रतिसाद; संपामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

हेही वाचा -घात की अपघात? तेलंगणा पोलिसांकडून चौकशी सुरू असलेल्या नाशिकच्या सराफाचा मृत्यू

महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने त्यांच्या विविध प्रलंबित 16 मागण्यांसाठी बुधवारी पुकारलेल्या राज्यव्यापी एक दिवसीय संपाला लासलगाव, येवला मनमाडसह नाशिक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव या संपामुळे बंद आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या आवारात शुकशुकाट आहे. या संपाचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून अगोदरच कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. असे असताना या संपामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

हेही वाचा -नाशिकमध्ये 'चिकन फेस्टिव्हल'चे आयोजन, फक्त 25 रुपयांत चिकन बिर्याणी

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने प्रलंबित 16 मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारल्याने आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी असलेल्या लासलगाव येथील बाजारपेठीतील माथाडी कामगारही संपात सहभागी झाल्याने लासलगाव बाजार समिती बंद आहे. सर्व बाजार समितीतील कांदा, धान्य आणि इतर लिलाव बंद राहणार असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details