नाशिक- माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपाला नांदगांव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वच बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद असल्याने संपाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत त्यांच्या प्रलंबित असलेल्या 16 मागण्या मान्य करण्यासाठी आज आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा याहीपेक्षा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
माथाडी कामगारांच्या 'संप'ला नाशकात उस्फूर्त प्रतिसाद... जिल्हाभर बाजार समित्या बंद! - माथाडी कामगार बंद बातमी
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने त्यांच्या प्रलंबित 16 मागण्यांसाठी आज पुकारलेल्या राज्यव्यापी एक दिवसीय संपाला नांदगांव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
![माथाडी कामगारांच्या 'संप'ला नाशकात उस्फूर्त प्रतिसाद... जिल्हाभर बाजार समित्या बंद! mathadi-workers band-in-nashik](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6207327-thumbnail-3x2-nashik.jpg)
हेही वाचा-थेट सरपंच निवड पद्धत रद्द करणारे विधेयक मंजूर; विरोधकांच्या गदारोळातच शिक्कामोर्तब
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने त्यांच्या प्रलंबित 16 मागण्यांसाठी आज पुकारलेल्या राज्यव्यापी एक दिवसीय संपाला नांदगांव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव बंद होते. त्यामुळे बाजार समित्यांच्या आवारात शुकशुकाट पसरलेला होता. या संपाचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अगोदरच कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला असताना संपामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण व गैरसोय झाली आहे. दरम्यान, शासनाने त्वरित याची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.