मनमाड (नाशिक) - भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरी जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करत घरूनच अभिवादन करण्यासाठी विनंती केली होती. त्यास राज्यातील जनतेने प्रतिसाद देत रविवारी (दि. 6 डिसें.) आपल्या घरातच अभिवादन केले.
मनमाड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी (दि. 6 डिसें.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांना मास्क व हॅण्ड सॅनिटायझर वाटप केले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते तसेच युवक आघाडी व महिला आघाडी पदधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. आंबेडकरांचे मनमाडशी घनिष्ठ नाते