महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Priya Berde Joins BJP : प्रिया बेर्डेंनी घड्याळ सोडून कमळ घेतले हाती; फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश - Priya Berde joins BJP

महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मराठी चित्रपट अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. त्यांच्यासह काही कलाकारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिकमध्ये आज भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत प्रिया बोर्डे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे.

Priya Berde Joins BJP
Priya Berde Joins BJP

By

Published : Feb 11, 2023, 7:25 PM IST

नाशिक :मराठी सिने अभिनेत्री प्रिया बेर्डेनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला,नाशिक मध्ये होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत हा प्रवेश पार पडला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. सद्या राज्यात भाजप सत्तेमध्ये असल्याने त्यांच्याकडे नेते आणि कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अभिनेते आणि कलाकारही भाजपमध्ये येत आहेत.

कमळ घेतले हाती :अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात वेगळी ओळख मिळवली आहे. दरम्यान त्यांनी त्यांच्या राजकारणाच्या इनिंगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पासून सुरुवात केली होती. त्यांनी 2020 मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चित्रपट, सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी बेर्डे यांना देण्यात आली होती. आता प्रिया बेर्डेसह इतर काही कलाकारांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली आहे. नाशिक येथे आयोजित भाजपाच्या राज्य कार्यकारणी बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सह भाजपाचे अनेक महत्त्वाचे मंत्री आणि नेते या बैठकीला हजर आहेत. अनेक नवे प्रवेश पक्षात होत आहे. त्यात मराठी सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे सह इतर काही कलाकारांच्या प्रवेशाचा देखील समावेश होत आहे.

राष्ट्रवादीचा आदर कायम राहील :राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेची, कलाकारांची जाण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लॉकडाउनच्या काळात लोक कलावंतांना राष्ट्रवादी पक्षाने मोठी मदत केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल कायमच आदर असल्याची भावना प्रिया यांनी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना प्रिया बेर्डे यांनी काही अटी ठेवल्या होत्या. यात राज्य शासनाच्या जाहिरातीमध्ये मराठी कलाकारांना प्राधान्य देण्यात यावं,ज्येष्ठ कलावंताच्या मानधनात वाढ करावी, तसेच मालिकांची शिफ्ट आठ तासांहून मोठी नसावी,अशा काही मागण्या होत्या. यासोबतच मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना 30 दिवसांत मानधन मिळायला हवे अशी मागणीही त्यांनी केली होती. आता भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी कोणत्या मागण्या ठेवल्या का? तसेच त्यांच्या किती मागण्या मान्य झाल्या हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा :Ravikant Tupkar Self Immolation : रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न; आता सुरू केले अन्नत्याग आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details