नाशिक - राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार आणि लोकप्रतिनिधींना मराठा समाजाकडून जाब विचारला जात आहे. त्याच प्रमाणे गुरुवारी नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहानांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले आहे.
नाशकात मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; अजित पवारांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल आहे. आरक्षण रद्द होण्यास मराठा समाजाकडून राज्य सरकारला जबाबदार धरले जात आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकारकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप करत यावेळी सरकारचा निषेधही व्यक्त करण्यात आला.

20 ते 25 कार्यकर्त्यांना नोटीस -
अजित पवार हे गुरुवारी नाशिक जिल्हा दौर्यावर असून ते कोरोना आढावा बैठक घेणार आहेत. तसेच आमदार कोकाटे यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यास देखील पवार उपस्थिती लावणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांकडून पवार यांचा ताफा अडविण्याची शक्यता होती. ती शक्यता विचारात घेऊन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह कार्यकर्त्यांना कलम 149 ची नोटीस जारी करण्यात आली आहे.
शहरातील अंबड, सरकारवाडा,सिडको परिसरातील पोलीस ठाण्यात, कार्यकर्ते स्थानबद्ध करण्यात आले आहेत. हे कार्यकर्ते अजित पवार यांच्या दौऱ्यात घोषणा देणे, ताफा रोखणे असे प्रकार करू शकतात, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 20 ते 25 कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात आली होती. तर दुसरीकडे पोलिसांकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.