नाशिक -राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 'मी ओबीसी असल्यामुळे टार्गेट केले जाते. हे करणारी टोळी टवाळखोर आहे', असे व्यक्तव केले. हे वक्तव्य मराठा संघटनांबद्दल केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सारथी संस्थेच्या कामाचा आढावा सांगत असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
वडेट्टीवारांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात मराठा संघटना आक्रमक
राज्यातील मराठा समाजातील तरुणांच्या शैक्षणिक उद्धारासाठी उभारण्यात आलेल्या सारथी संस्थेमधील अनियमिततेमधून मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. मात्र, या संस्थेत सर्व काही आलबेल असल्याचा दावा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. मात्र, हा दावा करत असताना विजय वडेट्टीवार यांनी मराठा संघटना टवाळखोर असल्याचे वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले.
राज्यातील मराठा समाजातील तरुणांच्या शैक्षणिक उद्धारासाठी उभारण्यात आलेल्या सारथी संस्थेमधील अनियमिततेमधून मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. मात्र, या संस्थेत सर्व काही आलबेल असल्याचा दावा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. मात्र, हा दावा करत असताना विजय वडेट्टीवार यांनी मराठा संघटना टवाळखोर असल्याचे वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले. वडेट्टीवार यांच्या या विधानानंतर राज्यातील मराठा संघटनांनी वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी मराठा समाज आणि संघटनांची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
एकीकडे उद्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार असताना याच सुनावणीच्या पूर्व संध्येला वडेट्टीवार यांनी हे वादग्रस्त विधान केल्याने सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी देखील खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी या सारथी संस्थेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आंदोलन केले होते. मात्र, आता याच संस्थेच्या कारभाराच्या दुरुस्तीची जबाबदारी असणारे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच वादग्रस्त विधान करत नवा वाद उभा केल्याने ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळे आता विजय वडेट्टीवार मराठा संघटनांची माफी मागणार की हा वाद अधिक चिघळनार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.