नाशिक - माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर अस्थी गोदावरी नदीच्या पवित्र रामकुंडात विसर्जित करण्यात आली.
नाशिकच्या रामकुंडात मनोहर पर्रीकरांच्या अस्थींचे विसर्जन - purohit
दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेली गोदावरी नदीमध्ये पर्रीकर यांच्या अस्थीचे वेदमंत्राच्या घोषात विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी मुंबई भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात अस्थींचे पूजन केले.
दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेली गोदावरी नदीमध्ये पर्रीकर यांच्या अस्थीचे वेदमंत्राच्या घोषात विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी मुंबई भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात अस्थींचे पूजन केले. यावेळी महापौर रंजना भानसी आमदार बाळासाहेब सानप देवयानी फरांदे सीमा हिरे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते तसेच भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुल्क आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी पौरोहित्य करत आणि वेदमंत्रांच्या घोषात अस्थी विसर्जित करण्यात आली.