नाशिक - शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर गोविंदनगर आणि मनोहर नगर केंद्रस्थानी ठेवत तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर 14 दिवस सील करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत आदेश काढला. या प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडून बाहेर येऊ शकणार नाहीत. अत्यावश्यक सेवा पुरवणारे वगळता बाहेरचा कोणीही व्यक्ती प्रतिबंधितक्षेत्रात जाऊ शकणार नाही. या परिसरातील नागरिकांची तपासणी होईल. या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
शहरातील मनोहर नगर, गोविंदनगर परिसर चौदा दिवस सील; कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खबरदारी - Nashik Corona Patient
मनोहर नगर, गोविंद नगर या परिसरात वास्तव्यात असलेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे हा परिसर केंद्रस्थानी ठेवत तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर 14 दिवस सील करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत आदेश काढला.
नाशिक कोरोना अपडेट
मनोहर नगर, गोविंद नगर या परिसरात वास्तव्यात असलेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. सध्या या रुग्णावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, कोरोनाबाधित व्यक्तीचे घर, सुमंगल को.ऑप. सोसायटी, मनोहर नगर, गोविंद नगर हा परिसर केंद्रस्थानी ठेऊन तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर १४ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आला आहे.