नाशिक - पोलिसांच्या ताब्यातील नाशिकच्या सराफाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. झालेल्या प्रकरणाचे पडसाद आज मनमाडला उमटले असून सराफ संघटनेने कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केला. या वेळी त्यांनी संबंधित पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
नाशिकातील सराफाच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ मनमाडला सुवर्णकार संघटनेचा बंद - News about Nashik police
पोलिसांच्या ताब्यातील नाशिकच्या सराफाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी मनमाडमध्ये सराफ संघटनेने बंद पाळत, हैदराबाद पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.
![नाशिकातील सराफाच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ मनमाडला सुवर्णकार संघटनेचा बंद manmad-goldsmiths-organization-called-off-action-against-hyderabad-police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6209954-322-6209954-1582714695236.jpg)
चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नाशिकच्या सराफ व्यावसायिक विजय बीरारी यांचा संशयास्पद मृत्यूचे पडसाद मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ सराफ असोशियन तर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला मनमाड शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सराफा बांधवांनी कडकडीत बंद पाळून या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. बीरारी यांनी चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरून हैदराबाद पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना शासकीय विश्राम गृहावर नेण्यात आले होते. तेथे चौथ्या मजल्यावरून पडून बीरारी यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सराफव्यावसायीकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी आज मनमाड बंद पाळण्यात आला.
हा बंद यशस्वी करण्यात सराफ संघटनेचे अध्यक्ष अरुण सोनवणे, रिकब ललवाणी, विजय भंडारी, विनोद वर्मा, तुषार गोयल, अंतु भामरे, प्रकाश बाविस्कर, संतोष बागुल, सचिन बाविस्कर,आमिन शेख यांचयासह सर्व सुवर्णकार बांधव सहभागी होते.