नाशिक - येवला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड माणिकराव शिंदे यांनी पक्ष विरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी विरोधी पक्षाचे पराभूत उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारात सक्रिय होऊन,छगन भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले होते. यामुळे त्याच्या वर पक्षातील शिस्तपालन समितीने कारवाई केली आहे. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नाशिक अँड माणिकराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी - Ad Manikrao Shinde expelled from party
येवल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्याचे मंत्री छगन भुजवळ यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अॅड माणिकराव शिंदे यांनी प्रचार केला होता. यामुळे त्यांच्या विरोधात पक्षाच्या शिस्तपालन समितीने करावाई केली.
या बाबत प्रदेश कार्यालयाकडे वृत्तपत्र कात्रणे व इतर पुरावे प्राप्त झाले होते. याची शिस्तपालन समितीकडून सत्यता तपासणी केली गेली. त्यानंतर प्रदेश कार्यालयाकडे अहवाल पाठवून माणिकराव शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई कारण्यात येऊ नये असे कळवले होते. या बाबत माणिकराव शिंदे यांच्याकडे खुलासा मागितला होता. मात्र, त्यांनी केलेला खुलासा सत्य परिस्थितीशी सुसंगत नसल्याने माणिकराव शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. याबाबत पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी कारवाईचे पत्र अॅड माणिकराव शिंदे यांना आणि नासिकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांच्याकडे दिले आहेत.