नांदगाव (नाशिक) - नांदगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे माणिकपुंज धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, ओव्हर फ्लो झाले आहे. तब्बल 8 वर्षानंतर धरण ओव्हर फ्लो झाले आहे. यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा तर हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि बळीराजा देखील सुखावला आहे.
तब्बल 8 वर्षानंतर माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो; पिण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी
नांदगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे माणिकपुंज धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, ओव्हर फ्लो झाले आहे. तब्बल 8 वर्षानंतर धरण ओव्हर फ्लो झाले आहे. यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा तर हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.
गेल्या काही दिवसापासून सलग होत असलेल्या जोरदार पावसामुळे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाले आहे. आठ वर्षानंतर प्रथमच सुरूवातीच्या पावसात धरण पूर्ण भरून वाहू लागल्यामुळे नांदगाव तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्यासोबत धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसोबत बळीराजा देखील चिंतामुक्त झाला आहे.
नांदगांव तालुक्यातील प्रमुख धरणापैकी माणिकपुंज हे एक धरण आहे. या धरणावर तालुक्यातील काही गावं तसेच नांदगांव शहराला पाणी पुरवठा केला जातो. धरण क्षेत्रात असलेल्या शेतीला देखील सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होतो.