नाशिक - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने साडेतीन शक्ती पीठांपैकी एक सप्तश्रृंगी गड, वणी येथे मंदिर बंद असल्याने प्राण्यांचे खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. लोकांच्या सानिध्यात राहून त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलून गेल्या आहेत. सप्तश्रृंगी गड न्यासाचे व्यवस्थापक यांनी गडावर विविध ठिकाणी त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली.
कोरोना : सप्तश्रृंगी गडावर प्राण्यांसाठी खाण्या-पिण्याची सोय
गेल्या कित्येक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने साडेतीन शक्ती पीठांपैकी एक सप्तश्रृंगी गड, वणी येथे मंदिर बंद असल्याने प्राण्यांचे खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. लोकांच्या सानिध्यात राहून त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलून गेल्या आहेत.
सप्तश्रृंगी गडावर प्राण्यांसाठी खाण्या-पिण्याची सोय
व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी स्व:त चितखडा, शिवालय तलाव, चंडी कापूर रस्त्यावर जावून माकडांना केळी आणि इतर खाद्य टाकून त्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. सप्तशृंगी गडावरील शिवालय तलावाजवळ जाताच लहान माकडांनी दहातोंडे यांच्या अंगा-खांदयावर बसून केळींचा आस्वाद घेतला.
Last Updated : Apr 22, 2020, 8:10 PM IST