नाशिक - जमिनीच्या वादातून टोळक्याने महिलेची हत्या (Woman Murder Plan in Nashik) करून घरदेखील पेटून दिल्याचा बनाव आरोपीने केला होता. आरोपीनेच याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. हत्या केलेली महिला ही आरोपीची मेहुणी होती. आरोपीचे आधीच लग्न झाले होते. त्याला दोन मेहुणी असून, त्यातील पहिल्या मेहुणीसोबतही त्याने लग्न केले होते. तसेच दुसऱ्या मेहुणीसोबत त्याचे अनैतिक संबंध (Illegal Relation with Sister In Law) होते. अनैतिक संबंधातून लग्नाचा तगादा लावल्याने दाजीनेच मेहुणीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीमधील हा प्रकार आहे. शरद महादू वाघ असेत ्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा -Nashik Crime : मेहुणीसोबत दाजीचे अनैतिक संबंध; लग्नाचा तगादा लावल्याने तिचा केला गेम
सुरुवातीला असा केला होता बनाव - आज (11 जून) पहाटे तीन वाजेच्या सुमारास 10 ते 15 लोकं जुन्या जमिनीच्या वादासाठी घरी आले होते. यावेली त्यांनी घरे जाळली तसेच महिलेची त्या जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. तसेच कातकरी कुटुंबांची तीन घरे जाळून टाकण्यात आली. याबाबतची तक्रार शरद महादू वाघ याने घोटी पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेचा पोलिसांनी खोलवर तपास केल्यानंतर तक्रारदारच आरोपी असल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधातून लग्नाचा तगादा लावल्याने दाजीने मेहुणीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.