नाशिक- शहरातील सिडकोतील संभाजी स्टेडियम परिसरात एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. महेंद्र तुळशीराम पाटील असे मृताचे नाव असून या व्यक्तीने विषारी औषध पिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज अंबड पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती जवळ सुसाईड नोट सापडली असून यानुसार महेंद्र यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सावकाराच्या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये एकाची आत्महत्या
नाशिक शहरातील सिडकोतील संभाजी स्टेडियम परिसरात एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. महेंद्र तुळशीराम पाटील असे मृताचे नाव असून या व्यक्तीने विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज अंबड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील संभाजी स्टेडीयम येथे सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बंद अवस्थेत असलेल्या सेतू कार्यालयाच्या पायऱ्यांवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसला. त्यांनी ही माहिती तत्काळ अंबड पोलीस ठाण्यातील पोलिसांना कळविली. माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनस्थळी केलेल्या पंचनाम्यात समोर आलेल्या माहितीवरून आढळून आलेला मृतदेह सिडकोच्या पाटीलनगर भागातील रहिवासी महेंद्र पाटील यांचा असल्याचे समोर आले. या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत.