नाशिक - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. या अटक केलेल्या तरुणाला सोडा नाही तर परिणाम वाईट होतील, अशी धमकी अटकेतील तरुणाच्या साथीदाराने दिली. यानंतर उत्तर प्रदेश येथील एटीएस टीमने नाशिकमधून त्या तरुणालाही अटक केली आहे.
मुख्यमंत्री आदित्यनाथांना आणखी एक धमकी... एकाला नाशिकमधून अटक - नाशिक लेटेस्ट न्यूज
घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशच्या एटीएस टीम ने मुंबई येथील चुनाभट्टी येथून कामरान अमीन खान (वय 25) या संशयिताला शनिवारी ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी बॉम्बने उडवून देणार आहे, ते एका विशेष समुदायासाठी शत्रू बनले आहेत. असे एका व्हाट्सअप मेसेजमध्ये म्हटले होते. याप्रकरणी गोमती नगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 501 (1) बी 506 आणि 507 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशच्या एटीएस टीम ने मुंबई येथील चुनाभट्टी येथून कामरान अमीन खान (वय 25) या संशयिताला शनिवारी ताब्यात घेतले.
यानंतर ताब्यात घेतलेल्या तरुणाला सोडा अन्यथा परिणाम वाईट होतील असा एक मेसेज उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाला होता. यानंतर उत्तर प्रदेशच्या एटीएस टीमने सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा मेसेज नाशिक येथून आल्याचे समजताच ह्याची माहिती नाशिक पोलिसांना दिली. नाशिकच्या एटीएस टीम ने काही वेळातच जुने नाशिक भागातून 20 वर्षीय युवकाला ताब्यात घेत उत्तर प्रदेशच्या एटीएस टीमच्या हवाली केले आहे.