नाशिक - मुंबईतील बालकाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याला उत्तर प्रदेश मध्ये घेऊन जात असताना नाशिक रोड पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीसह बालकाची सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे नाशिक रोड पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.अपहरण झालेला मुलाला सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पैशासाठी चार वर्षीय मुलाचे अपहरण करून यूपीला नेणाऱ्या व्यक्तीस नाशिकरोड पोलिसांकडून अटक - नाशिकरोड पोलीस
मुंबईतील बालकाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याला उत्तर प्रदेश मध्ये घेऊन जात असताना नाशिक रोड पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीसह बालकाची सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे नाशिक रोड पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
बालकाचे अपहरण करून ती व्यक्ती नाशिकच्या दिशेने रवाना झाली होती -
मुंबई येथून चेंबूर भागात एका बालकाचे अपहरण करून ती व्यक्ती नाशिकच्या दिशेने रवाना झाली आहे, अशी माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलीस आयुक्तांनी यांची सुचना तातडीने नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांना दिली आणि कारवाई करण्यात आली. त्यानुसार शिंदे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून तपास पथके तयार केली आणि अत्यंत सावधपणे शोध घेत पोलिसांनी ही मोहीम फत्ते केली. अपहरण करणाऱ्या संशयित आरोपीलाही बालकासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बालकाचे अपहरण करुन त्याला उत्तर प्रदेशात नेत असल्याची तिवारीने दिली कबुली -
याबाबत माहिती देताना नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले की, चेंबूरमधून सोमवारी (दि.८) सायंकाळी एका लहान मुलाचे अपहरण केल्यानंतर संशयित आरोपी रामपाल उदयभान तिवारी (रा.बंसतपुरराजा, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) हा रेल्वेने नाशिकरोडच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती. प्रकरण गंभीर असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊलं उचलत नाशिकरोड हद्दीत शोधमोहीम हाती घेतली. तपासादरम्यान देवी चौकात एक व्यक्ती लहान मुलाला घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस कर्मचारी कैलास थोरात यांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी तातडीने त्या भागात धाव घेत मंगळवारी तिवारीला ताब्यात घेतले. खंडणीसाठी या बालकाचे अपहरण करुन त्याला उत्तर प्रदेशात जाणार असल्याची कबुली तिवारीने दिली. संशयितासह बालकाला नाशिकरोड पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक न्याहदे त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.