नाशिक- पंतप्रधान मोदी व केंद्राने पश्चिम बंगालमध्ये सर्व ताकद लावली होती. पण ममतादीदी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या आणि जिंकल्यासुद्धा, अशी प्रतिक्रिया अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. बंगाल निकालानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. छगन भुजबळ यांनीदेखील ममतादीदींचे अभिनंदन केले आहे.
ममतादीदीद विरुद्ध सगळे अशी होती लढाई -
केंद्राने पूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधानांच्या एका दिवासाआड सभा देखील घेण्यात आली. केंद्राचे काही मंत्री बंगालमध्ये तळ ठोकून होते. ममता दीदी एकट्या आणि हे सगळे ही अशी लढाई होती. पण ममता लढल्या आणि प्रचंड बहूमतांनी जिंकत आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले.