नाशिक - शहरातील मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये विनाशुल्क पार्किंग करण्याचे आदेश नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत. शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी यासंदर्भात महासभेत प्रस्ताव मांडला होता. महापौरांनी या प्रस्तावाला मंजूरी देत मॉल धारकांना नोटीस बजावून पार्किंग विनामूल्य करण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यापाठोपाठ आता नाशिकमधील मॉल, मल्टिप्लेक्समध्येही विनाशुल्क पार्किंग - parking
महापौरांनी या प्रस्तावाला मंजूरी देत मॉल धारकांना नोटीस बजावून पार्किंग विनामूल्य करण्याचे आदेश दिले आहेत.

संग्रहित छायाचित्र
नाशिक महानगरपालिका
व्यावसायिक दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना वाहनतळाची सुविधा देणे अभिप्रेत असते. परंतु, शहरातील मॉल धारक ग्राहकांकडून दुचाकीला २० तर चारचाकी वाहनांना तीस ते चाळीस रुपयाची शुल्क आकारणी करतात. यातून सामान्य ग्राहकांची मोठी लूट होत असल्याचा मुद्दा मांडत नाशिकमधील शिवसेना नगरसेवकांनी शहरातील सर्व मॉलमध्ये वाहनतळाची सुविधा मोफत करावी, असा प्रस्ताव आजच्या महासभेत मांडला होता. त्याला महापौरांनी मंजुरी दिली.
Last Updated : Jun 25, 2019, 11:29 PM IST