नाशिक - जिल्ह्यातील मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयास 38 रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असून त्यातील 8 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर 30 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नाशिक शहरातील 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मालेगावात आता कोरोनाबाधित 85 रुग्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात एकुण 99 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून त्यातील 6 जणांचा बळी गेला आहे.
Coronavirus : मालेगावमध्ये आणखी 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह,जिल्ह्यातील रुग्णसंख्या 99 तर मृतांची संख्या 6 वर
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल 8 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मालेगावात आता कोरोनाबाधित 85 रुग्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात एकुण 99 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून त्यातील 6 जणांचा बळी गेला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव शहरात 3 मे पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला असून शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी मालेगावात रुग्णालयात संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मालेगावात कोरोनाबाधित रुग्ण वाढण्यासह मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, नाशिक शहरातील गोविंदनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.
रविवारी जिल्ह्याचे 52 अहवाल प्राप्त झाले. यात मालेगावचे 8 पॉझिटिव्ह आहेत. तर आज 14 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे याआधीचेही 213 अहवाल प्रलंबित आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत 892 अहवालांपैकी 99 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 585 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटीव्ह अहवालांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून ते सहाही नागरिक मालेगाव येथील होते. तसेच जिल्ह्यात 84 कोरोना बाधितांवर रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत..
नाशिक जिल्हा एकूण कोरोना बाधित आकडेवारी : 99
मालेगाव: 85
नाशिक शहर : 10
उर्वरित जिल्हात : 4
उपचार सुरु: 84
एकूण मृत : 6
कोरोनमुक्त: 1