नाशिक - मालेगाव शहरात 'शब-ए-बारात' पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. हजारो मुस्लीम बांधव बडा कब्रस्तान आणि आयशानगर कब्रस्तानमध्ये आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूमुळे संचार बंदी आणि लॉकडाऊन असल्यामुळे पोलीस प्रशासन आणि कब्रस्तान ट्रस्टी यांच्याकडून 9 एप्रिलच्या शब-ए-बारात या दिवशी कोणीही कब्रस्तानमध्ये येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय खूप कठीण असला तरी सर्वांनी याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सार्वजनिक शब-ए-बारात रद्द..कब्रस्तानलाही कुलूप; मालेगावातील मुस्लीम बांधवांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - shab e barat news
मालेगाव शहरात 'शब-ए-बारात' पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. हजारो मुस्लीम बांधव बडा कब्रस्तान आणि आयशानगर कब्रस्तानमध्ये आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात.
हेही वाचा......तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार राजीनामा
मालेगाव शहरात अनेक वर्षांपासून शबे ए बारात साजरी कऱण्यात येते. 2006 मध्ये बॉम्बस्फोट झाले तरी लोक रात्री कब्रस्तानमध्ये आले होते. मात्र सध्याची परिस्थिती वेगळी असल्याने सर्वांना घरी राहण्याची विनंती करण्यात आली आहे. जर हजारे-लाखो लोक कब्रस्तानमध्ये आले तर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, ट्रस्टी अॅड. नियाझ लोधी, मौलाना बारी कस्मी, जहिर अहमद अश्रफी, सुफी गुलामरासुल यांनी मुस्लीम बांधवांना कब्रस्तान येथे न येण्याचे आवाहन केले आहे.