मालेगाव ( नाशिक ) - मागील दोन दिवसांपासून तळवाडे भागात अतिवृष्टी होत आहे. अशात कलमदरा बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आणि बंधारा फुटला. या बंधाऱ्यातील पाणी तळवाडे, आंबसन, गारेगाव वाघखोरे यासह अनेक गावांमध्ये शिरले. यात २३० हून अधिक हेक्टरवरिल शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर १७५ पेक्षा जास्त जनावरेही वाहून गेली आहेत. दरम्यान, अद्याप या घटनेत सुदैवाने जीवीतहानी झालेली नाही.
नाशिक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून मालेगाव परिसरात देखील अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे तळवाडे भागात असलेल्या कलमदरा बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आणि बंधारा फुटला. या बंधाऱ्यातील पाणी तळवाडे, आंबसन, गारेगाव, वाघखोरे यासह अनेक गावामध्ये शिरले. बंधारा फुटल्याने ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि पाण्यात गायी, म्हशी, शेळ्या आदी सुमारे १७५ पेक्षा जास्त जनावरे वाहून गेल्याचा अंदाज आहे. याशिवाय तब्बल २३० हेक्टरवरील उभे पीक उध्वस्त झाले आहे. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली.