मकरसंक्रांत विशेष; केवळ 25 मिनिटात बनवा तिळाची कुरकुरीत रेवडी - मकरसंक्रांत स्पेशल
थंडीच्या दिवसात तीळ आणि गूळापासून बनवलेले पदार्थ आवर्जून खावे ते आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. रेवडी बनवतांना तीळ आणि गूळ सोबत तिमूटभर सोडा वापरल्यास रेवडी छान कुरकुरीत होतात आणि खातांना पण आनंद येतो.
![मकरसंक्रांत विशेष; केवळ 25 मिनिटात बनवा तिळाची कुरकुरीत रेवडी मकरसंक्रांत विशेष; केवळ 25 मिनिटात बनवा तिळाची कुरकुरीत रेवडी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10195851-thumbnail-3x2-revdi.jpg)
मकरसंक्रांत विशेष; केवळ 25 मिनिटात बनवा तिळाची कुरकुरीत रेवडी
नाशिक- मकर संक्रांत आली. म्हणजे तिळगुळ आणि तिळगुळाचे अनेक प्रकार आपल्याला खायला मिळतात. त्यातील एक पदार्थ म्हणजे तिळाची रेवडी. हा एक पारंपरिक पदार्थ आहे. संक्रांतीनिमित्त ज्या प्रकारे महाराष्ट्रात तिळाचे लाडू, पोळ्या, वडी बनवली जाते त्याप्रमाणे तिळाची रेवडी दिली जाते. पंजाबमध्ये ज्यांच्याकडे नुकताच मुलाचा विवाह झाला किंवा मुलाचा जन्म झाला तर आजूबाजूच्या परिसरात तिळाची रेवडी वाटण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रासोबत पंजाबमध्येही रेवडी हा लोकप्रिय स्वीट डिश आहे.
मकरसंक्रांत विशेष; केवळ 25 मिनिटात बनवा तिळाची कुरकुरीत रेवडी
Last Updated : Jan 11, 2021, 2:54 PM IST