नाशिक - महाराष्ट्र दिन आज नाशिकमध्येही उत्साहात पार पडला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. नाशिक पोलिसांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत उपस्थितांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र दिन : नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण - police
महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित असणाऱ्या अधिकारी आणि नागरिकांच्या भेटी घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री गिरीश महाजन
महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
पोलीस दलातील विशेष महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या डॉग स्कॉड पथक, जलद प्रतिसादात पथक, अग्निशामक पथक अशा विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या पथकांचे चित्ररथद्वारे प्रदर्शन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित असणाऱ्या अधिकारी आणि नागरिकांच्या भेटी घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.