नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शरद पवारांचे खंदे समर्थक असलेले छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार यांच्यासोबतच जाणे पसंत केले. त्यामुळे शरद पवार चांगलेच दुखावले आहेत. त्यामुळे शरद पवार आज येवल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. आजच्या येवल्यातील सभेत शरद पवार काय बोलणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. शरद पवार रस्ते मार्गाने येवल्यात पोहोचत असून मुंबईतून सकाळी आठ वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
छगन भुजबळांविरोधात शरद पवार मैदानात :अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली. छगन भुजबळ हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीत शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र छगन भुजबळांनीच शरद पवार यांच्याविरोधात मोर्चा उघडल्याने राष्ट्रवादीसह राज्यातील राजकारणात खळबळ उडाली. त्यामुळे शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
शरद पवार राज्यभर करणार दौरे :राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार वयाच्या 83 व्या वर्षी बाहेर पडणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपण आगामी काळात राज्य पिंजून काढणार असल्याचे शरद पवार यांनी मुंबईतील सभेत स्पष्ट केले. शरद पवार राज्यभरात सबा घेणार असून त्याची सुरुवात येवला येथील सभेने करण्यात येत आहे. येवला येथील सभेची जय्यत तयारी झाल्याची माहिती त्यांच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
शरद पवारांच्या दौऱ्यावर पावसाचे सावट :शरद पवार आज सकाळी आठ वाजता मुंबईतून आपल्या दौऱ्याची सुरुवात करत आहेत. सकाळी मुंबईतून शरद पवार हे रस्ते मार्गाने नाशिकला पोहोचणार आहेत. त्यानंतर नाशिकवरुन ते शक्तीप्रदर्शन करत येवल्यात जाणार आहेत. मात्र शरद पवारांच्या या दौऱ्यावर पावसाचे सावट आहे. रत्नागिरीला आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यासह राज्यभरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा -
- Sharad Pawar Rally In Nashik : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार शरद पवारांची तोफ, दौरा रद्द झाल्याची अफवा
- Political crisis in NCP : येवल्यात अन्याय झालेल्यांना शरद पवार आशीर्वाद देणार, आमदार रोहित पवार यांची छगन भुजबळांवर टीका