नाशिक: छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात शरद पवार सभा घेणार असताना छगन भुजबळही पवारांविरोधात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये रॅली काढण्यात येणार आहे. यामुळे एकाच दिवशी दोन्ही नेते समर्थकांसह आपली ताकद दाखवणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे..
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. पक्षफुटीनंतरची पहिली सभा भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यामध्ये घेऊन शरद पवार अजित पवार गटाला आव्हान देणार आहेत. येवला बाजार समिती आवारात ज्यावेळी शरद पवार यांची सभा सुरू होईल, त्याचवेळी इकडे भुजबळ यांच्या रॅलीला सुरवात होणार आहे. जेणेकरून टीव्ही चॅनलमध्ये शेजारी शेजारी दोन्ही घडामोडी लोकांना दिसणार आहे.
भुजबळ यांचे जंगी स्वागत होणार-संभाव्य डॅमेज कंट्रोल करता येईल अशी रणनीती भुजबळ टीमकडून आखण्यात आली आहे. छगन भुजबळ हे सकाळी मुंबईहुन नाशिकला मार्गक्रमण करणार आहेत. त्या ठिकाणी भुजबळ समर्थक त्यांचे जंगी स्वागत करणार आहेत. सकाळी 10.45 वाजता ठाणे,12.00 वाजता शहापूर,1.00 वाजता इगतपुरी ,1.45 वाजता पाथर्डी फाटा 2 वाजता भुजबळ फार्म येथे हे स्वागत होणार आहे.
भुजबळांचे शक्ती प्रदर्शन-भुजबळांचे शक्ती प्रदर्शन प्रामुख्याने नाशिक शहरात होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील देवळाली, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण, नांदगावमधून कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाची प्रमुख भिस्त शहरावर खास करून जुने नाशिकवर आहे. रॅलीसाठी भुजबळ यांनी गर्दी जमवण्याचे सामर्थ्य असणाऱ्या जुन्या शिलदारांवर जबाबदारी दिली आहे. तसेच या रॅलीत भुजबळांची संघटना असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते देखील मोठया संख्येने सहभागी होणार आहे. त्यामुळे हे शक्ती प्रदर्शन कसे होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
स्वार्थासाठी अजित पवारांचा वापर- राष्ट्रवादी पक्ष फुटल्याचे खापर अजित पवारांवर फोडता येणार नाही. शरद पवार यांची येवल्यात आज सभा होणार आहे. काकांच्या बाबतीत मी भावनिक आहे. भाजप फोडाफोडी करणारा पक्ष असून पक्ष फुटल्याचे खापर एकट्या अजित पवारांना देऊन चालणार नाही. त्यांच्या आजुबाजूच्या लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अजित पवारांना नेतृत्व करायला लावले, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.अजित पवार कर्तृत्ववान नेते असल्याने भाजपने त्यांना जवळ केले. कर्तृत्ववान नेतृत्व भाजपने संपविते, ते अजित पवारांच्या बाबतीत होऊ नये अशी, भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-