नाशिक- महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक येथील मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोनाच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत तयारी सुरू झाली असून त्या प्रस्तावित प्रयोगशाळेची पाहणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी करत आढावा घेतला.
नाशकात कोरोना तपासणी प्रयोगशाळा; विधानसभा उपाध्यक्षांकडून आढावा - nashik lockdown
डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. येथे प्राथमिक सर्व तयारी करण्यात आली असून विविध अद्ययावत तपासणी यंत्रसामग्री बसविण्यास सुरुवात झाली आहे.
नाशकात कोरोना वैद्यकीय प्रयोगशाळा व्हावी यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर मागणीबाबत त्वरित कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांना आदेशित केले होते. त्यानुसार मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. येथे प्राथमिक सर्व तयारी करण्यात आली असून विविध अद्ययावत तपासणी यंत्रसामग्री बसविण्यास सुरुवात झाली आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सदर प्रयोगशाळेची पाहणी करत माहिती जाणून घेतली. सदर प्रयोगशाळेच्या डॉक्टरांचे प्रशिक्षण सुरू असून लवकरच सदर प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. या प्रयोगशाळेत कोरोनासोबतच स्वाईन फ्ल्यू व इतर साथीचे आजार यांचीही तपासणी होणार आहे. यावेळी डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मृणाली पाटील, डॉ एन.एस.पाटील आदी उपस्थित होते.