महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! नाशिकमध्ये प्रियकराने प्रियसीला जिवंत जाळले

येवला येथील खामगाव भागात राहणाऱ्या पीडित महिलेच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती उदरनिर्वाहासाठी आडगाव मेडिकल कॉलेजमधील कॅन्टीनमध्ये काम करत होती. तसेच या भागात असलेल्या दुशिंगे मळ्यात भाड्याच्या खोलीत राहत होती. दरम्यान, तिची ओळख प्रवीण कृष्णा डोईफोडे (रा. कोणार्क नगर, आडगाव नाका) याच्याशी झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेम संबंधामध्ये झाले. या प्रेम संबंधाची माहिती तिच्या कुटुंबाला देखील होती.

पोलीस ठाणे आडगाव, नाशिक

By

Published : Sep 10, 2019, 9:00 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील आडगाव भागात किरकोळ कारणावरून प्रियकराने प्रियसीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. यात प्रेयसी 80 टक्के भाजली. ती मृत्युशी झुंज देत आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा -अजबच.. चोरांना मिळतो 'मासिक पगार'.. नागपूरमध्ये पगारी चोरांची टोळी गजाआड

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मूळ येवला येथील खामगाव भागात राहणाऱ्या पीडित महिलेच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती उदरनिर्वाहासाठी आडगाव मेडिकल कॉलेजमधील कॅन्टीनमध्ये काम करत होती. तसेच या भागात असलेल्या दुशिंगे मळ्यात भाड्याच्या खोलीत राहत होती. दरम्यान, तिची ओळख प्रवीण कृष्णा डोईफोडे (रा. कोणार्क नगर, आडगाव नाका) याच्याशी झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेम संबंधामध्ये झाले. या प्रेम संबंधाची माहिती तिच्या कुटुंबाला देखील होती.

हेही वाचा - चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीने काढलेल्या मोर्चाने दणाणली मुंबई

रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास पीडित महिला आणि प्रवीण यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. या दरम्यान आरोपीने सोबत आणलेली डिझेलची बाटली तिच्या अंगावर टाकत तिला पेटवून दिले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर महिलेच्या ओरडण्याच्या आवाजावरून तिला आजूबाजूच्या नागरिकांनी आडगाव वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. यात ही पीडित 80 टक्के जळाली आहे.

हेही वाचा - चेंबूर येथील मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक

घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संशयित आरोपी कृष्णा डोईफोडे याचा शोध घेतला असता त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी आडगाव पोलिसात संशयित आरोपी कृष्णा डोईफोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास उपनिरीक्षक दिनेश मुळे करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details