येवला (नाशिक)- बाजारभाव नसल्यामुळे काढणीला आलेल्या कोबी फ्लाँवर पिकावर येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील शेतकऱ्याने आपली जनावरे चरण्यासाठी सोडली आहेत. शेतकरी पुंजाराम शंकर कोल्हे यांनी अडीच महिन्यांपूर्वी आपल्या शेतात 20 गुंठे कोबी व 20 गुंठे फ्लाँवरची लागवड केली होती. कोबी व फ्लाँवर पीक निघण्यास सुरुवात झाली. मात्र, कवडीमोल भावाने पीक जात असल्याने संतप्त शेतकऱ्याने उभ्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिली.
येवल्यात कोबी व फ्लाँवर पिकात जनावरे चरण्यास सोडली
औषधे व मशागतीचा तेरा हजार रुपये खर्च असा एकूण पंचवीस हजार रुपये खर्च झाला. एवढा खर्च करून त्यांनी पिकही जोमात आणली. मात्र, काढणीला आलेल्या या पिकाला सध्या कवडीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे त्यांनी या काढणीला आलेल्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिली.
येवला
उत्पादन खर्च निघाला नाही...
यासाठी लागणारी रोपे त्यांनी निफाड तालुक्यातील उगाव शिवडी येथून आणली होती. त्यासाठी त्यांना जवळपास बारा हजार रुपये खर्च केला होता. यानंतर लागवड, खते, कीटक नाशक औषधे व मशागतीचा तेरा हजार रुपये खर्च असा एकूण पंचवीस हजार रुपये खर्च झाला. एवढा खर्च करून त्यांनी पिकही जोमात आणली. मात्र, काढणीला आलेल्या या पिकाला सध्या कवडीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे त्यांनी या काढणीला आलेल्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिली.