महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 17, 2019, 7:06 PM IST

ETV Bharat / state

नाशिक : ऐकलं का? देशात प्रथमच लोकसभेचे उमेदवार आले एकाच व्हॉट्सअॅप ग्रुपवर

लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या सर्वच उमेदवारांचा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपद्वारे आचारसंहिता पालनासह निवडणुकीच्या संदर्भातील सर्व माहिती दिली जात आहे.

माहिती देताना अधिकारी

नाशिक - लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान अनेक उमदेवार एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना दिसतात. मात्र नाशकातील लोकसभेचे उमेदवार एकाच व्हॉट्सअॅपवर ग्रुपवर आले आहेत. त्यांच्याशी एकाचवेळी संवाद साधणे व माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने हा देशातील पहिलाच उपक्रम नाशिकमध्ये अंमलात आणला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या सर्वच उमेदवारांचा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपद्वारे आचारसंहिता पालनासह निवडणुकीच्या संदर्भातील सर्व माहिती दिली जात आहे. विशेष म्हणजे याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पुढाकार घेत तसे पत्रही संबंधितांना दिले आहे.

माहिती देताना अधिकारी

देशातील हा पहिलाच अनोखा उपक्रम असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सांगितले आहे. विशेष म्हणजे या ग्रुपच्या माध्यमातून उमेदवाराला कुठली ही माहिती अथवा अडचण आल्यास त्याचे काही वेळात निराकरण होण्यास मदत होणार आहे. यंदा निवडणूक अतिशय पारदर्शक आणि निर्भीड वातावरणात पार पडावी, तसेच कुठलाही कायदा सुरक्षेचा प्रश्न होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने विशेष नियोजन केले आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी नाशिक जिल्ह्यात होताना दिसून येत आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या व्हॉटसअॅप ग्रुपवर फक्त जिल्हा निवडणूक अधिकारीच पोस्ट करू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details