नाशिक - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी खरेदीसाठी नागरिक मोठया संख्येने बाहेर पडत आहे. मात्र, कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता या दोन्ही दिवशी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जारी केले आहेत. असे असले तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नाशिकमध्ये रोज 500 ते 600 नवीन रुग्णांची भर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. त्यादृष्टीने निर्बंध लावण्यात आले आहेत.
नाशकात शनिवारसह रविवारी टाळेबंदी जाहीर झपाट्याने पसरणार्या करोना संसर्गाची साखळी तोडणे हा हेतू
सिनेमा हाॅल, पर्यटन व मनोरंजनाची ठिकाणे माॅल, हाॅटेल व उपाहारगृहे व खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होते. त्यातही नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे या सुरक्षेच्या नियमांचे सरार्स उल्लंघन करत असतात. यासाठी नागरिकांना दंड आकारला जात असला तरी नागरिक नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी कोरोनाला निमंत्रण ठरत असल्याने जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवारी शहरासह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद राहतील, असे आदेश जारी केले आहेत. मात्र, यामध्ये जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांना वगळण्यात आले आहे. झपाट्याने पसरणार्या करोना संसर्गाची साखळी तोडणे हा त्यामागचा मुख्य हेतू असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.
हेही वाचा-सचिन वझेंना अटक करा, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मागणी
या गोष्टी सुरू राहणार-
बाजारपेठा जरी बंद राहणार असल्यातरी जीवनावश्यक वस्तुंच्या सेवेची दुकाने सुरू राहणार आहेत. यामध्ये रुग्णालये, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला व वृत्तपत्र वितरण यांचा समावेश आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पीय अधिवेशन LIVE Updates : 'अन्वय नाईक प्रकरणी माझी चौकशी करा'; फडणवीसांचं गृहमंत्र्यांना खुलं आव्हान!
गर्दी टाळण्यासाठी निर्णय
शनिवार रविवार लॉकडाऊन लावण्यात आलेले नाशिक हे औरंगाबादनंतर पहिले शहर आहे. औरंगाबादेत ११ मार्च ते ४ एप्रिल अंशतः लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे, तर शनिवार रविवार पूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत.सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी दर शनिवार व रविवारी जीवनावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहणार आहेत. पुढील आदेश जारी होईपर्यंत ही बंदी कायम राहिल असे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हटले आहे.