इगतपुरी (नाशिक) -संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर जिल्हा बंदीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, हे आदेश ठिकाणे धुडकावून लावण्यात आले. यात प्रामुख्याने जबाबदारी होती ती पोलीस प्रशासनावर. मात्र पोलीस प्रशासनाने अनेकांना जिल्हा बंदीचे आदेशाला केराची टोपली दाखवली. या पार्श्वभूमीवर इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.
Video: जिल्हाबंदीच्या आदेशाला पोलिसांकडून केराची टोपली - nahik corona virus
नाशिक जिल्ह्याच्या वेशीवर संचारबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. इगतपुरीच्या तहसिलदारांनी वेशीवर येणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी करत हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या वेशीवर संचारबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. इगतपुरीच्या तहसिलदारांनी वेशीवर येणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी करत हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. नाशिक जिल्ह्याच्या वेशीवर मुंबई-पुण्याच्या बाजूने येणाऱ्या अनेक वाहनांची तपासणी करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले, की पोलिसांकडून अशा विविध वाहनांना सोडून दिले जात होते. अनेक जण हितसंबंधांच्या जोरावर जिल्हाबंदीतून मार्ग काढत थेट आपल्या गावी पोहोचत आहे. मात्र, हा सगळा प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय.