नाशिक -निफाड तालुका पाणीटंचाईचा सामना करत असताना टेस्टिंगच्या नावाखाली नांदूर मध्यमेश्वर धरणातून हजारो क्यूसेक्स पाण्याचा आवर्तन सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निफाड तालुक्यातील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नाशिकमधील नांदूर मधमेश्वरचे पाणी सोडल्याने स्थानिक शेतकरी संतप्त
गेल्या महिनाभर पावसाने दडी मारलेली असतानाच सोमवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेस्टिंगच्या नावाखाली नांदूर-मध्यमेश्वर धरणाचे तीन गेट उघडून हजारो क्यूसेक्स पाणी वाया घालवले यामुळे विनाकारण पाणी सोडणाऱ्या या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निफाड तालुक्यातील स्थानिक शेतकरी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
धरणातून पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
जिल्हाभरातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. गेल्या महिनाभर पावसाने दडी मारलेली असतानाच सोमवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेस्टिंगच्या नावाखाली नांदूर-मध्यमेश्वर धरणाचे तीन गेट उघडून हजारो क्यूसेक्स पाणी वाया घालवले यामुळे विनाकारण पाणी सोडणाऱ्या या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निफाड तालुक्यातील स्थानिक शेतकरी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना खंडू बोडके पाटील यांनी निवेदनही दिले आहे. यात नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदाकाठच्या सुमारे तीस गावांना तसेच निफाड शहर लासलगाव सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला पाणी पुरवठा केला जातो मात्र सध्या पाऊस नसतानाही अधिकाऱ्यांनी गेट टेस्टिंग च्या नावाखाली हजारो क्यूसेस पाणी सोडल्यानं भविष्यात पाणीटंचाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अन्यथा जन अंदोलन छेडले जाईल
जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केला असल्याचा आरोप देखील यावेळी केला आहे. अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे निफाड तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने अधिकार्यांवर कारवाई करावी. अन्यथा तीव्र जन अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी दिला आहे. यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे या अधिकार्यांची चौकशी करतात का हे पाहवे लागले.