नाशिक- लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे हे विजयी झाले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांचा पराभव केला. यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार आणि अपक्ष माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये 'चौरंगी' अशी झाली होती. त्यामध्ये हेमंत गोडसे यांनी बाजी मारली आहे.
LIVE UPDATE -
- 3:30 - शिवसेनेचे हेमंत गोडसे 85 हजार मतांनी आघाडीवर
- 2:30 - सहावी फेरी: शिवसेनेचे हेमंत गोडसे 50 हजार मतांनी आघाडीवर
- 1:00 शिवसेनेचे हेमंत गोडसे 32 हजार मतांनी आघाडीवर
- 11:30 - तिसरी फेरीः शिवसेनेचे हेमंत गोडसे 24 हजार मतांनी आघाडीवर तर समीर भुजबळ पिछाडीवर
- 11:00 - दुसरी फेरीः शिवसेनेचे हेमंत गोडसे 15 हजार मतांनी आघाडीवर तर समीर भुजबळ पिछाडीवर
- 08:40 - हेमंत गोडसे आघाडीवर
नाशिक- लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सेंट्रल वेअर हाऊस गोडाऊनमध्ये सुरूवात झाली आहे. या गोडावून परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याता आला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून यंदा आघाडीकडून राष्ट्रवादी माजी खासदार समीर भुजबळ, भाजप-शिवसेना युतीकडून खासदार हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक पवन पवार तर भाजपचे बंडखोर आमदार माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यामुळे ही निवडणूक चौरंगी झाली आहे. या रणांगणात कोण बाजी मारणार हे येत्या काही तासात स्पष्ट होईल.