नाशिक -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून पुढील आदेश येईपर्यंत मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले. हे आदेश पारीत होताच तळीरामांनी दारू दुकानांवर मोठ्या प्रमाणत गर्दी केली. एकीकडे प्रशासन गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घेत असताना दुसरीकडे दारू विकत घेणाऱ्या तळीरामांच्या गर्दीचे काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
हेही वाचा...CORONA : 'लॉक डाऊन'मुळे मद्यपींची तारांबळ...दारू मिळवण्यासाठी अनेक उठाठेवी
राज्यात कोरोना विषाणूचा विळखा हळूहळू वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मद्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मद्य मिळणार नसल्याच्या भीतीने नाशिकमध्ये मद्यपींनी मद्य विक्री करणाऱ्या दुकानांबाहेर गर्दी केली होती.