नाशिक- मागील 40 दिवसांपासून बंद असलेले वाईन शॉप आता सुरू होणार आहेत. केंद्र सरकारने रेड झोनमध्येही वाईन शॉप सुरू करण्याबाबत निर्देश दिल्यानंतर आता वाईन शॉप चालकांकडून वाईन शॉपबाहेर मद्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. अनेक वाईन शॉप बाहेर ग्राहकांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून मंडप घातले जात आहेत.
केंद्र सरकारने रेड झोनमध्येही वाईन शॉप सुरू करण्याबाबत निर्देश असले तरी नाशिकमध्ये सर्वच मद्यविक्री दुकानदारांनीकडून वाईन शॉपी बाहेर सुरक्षित अंतर ठेवून ग्राहक उभे राहतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, ही सर्व तयारी झाली असली तरी नाशिक जिल्हाधिकारी यानी वाईन शॉपी सुरू करण्याचे कुठलेही आदेश अद्यापपर्यंत दिलेले नाही. म्हणून अजूनही वाईन शॉप सुरू होणार का? हा संभ्रम कायम आहे.
कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह 14 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये आहेत. सुरुवातीला केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी होती. मात्र, आता ग्रीन, ऑरेंज आणि रेड या तिन्ही झोनमधी बाजारपेठा आणि मॉलमध्ये नसलेल्या स्वतंत्र मद्यविक्री दुकानांना परवानगी मिळाली आहे.
मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र तूर्तास मद्यविक्रीला अजिबात परवानगी नाही.
नाशकात तळीरामांसाठी खास व्यवस्था... मद्य दुकानाबाहेर मंडपाची सोय
टाळेबंदीच्या काळात सर्व मद्यदुकाने बंद झाली होती. यामुळे तळीरामांची मोठी तारांबळ उडाली होती. पण, आता सर्वत्र सशर्त मद्याची दुकाने सुरू करण्यात येणार असल्याने तळीरामांमध्ये सामाजिक अंतर रहावे व त्यांना उनाचा त्रास होऊ नये, यासाठी मद्यविक्री दुकानदारांनी काळजी घेत मंडप घातले आहेत.
दुकानाबाहेरील मंडप