महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 36 जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना पत्र - Muslim community agitation

मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुस्लीम समाज आरक्षण समितीच्यावतीने 36 जिल्हे 36 दिवस आंदोलन सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 36 जिल्ह्यांतून पत्र लिहण्यात आले.

protest
मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन

By

Published : Dec 19, 2020, 3:42 PM IST

मनमाड(नाशिक) - मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुस्लीम समाजातर्फे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र भेजो आंदोलन करण्यात आले. शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पत्र देण्यात आले.

मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन

36 जिल्हे, 36 दिवस आंदोलन

मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुस्लीम समाज आरक्षण समितीच्यावतीने 36 जिल्हे 36 दिवस आंदोलन सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 36 जिल्ह्यांतून पत्र लिहण्यात आले. नांदगाव तालुका मुस्लीम आरक्षण समितीच्यावतीने आज पाकिजा कॉर्नर येथून ढोल ताशा वाजवत मिरवणूक काढण्यात आली. शहरातील एकात्मता चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रेल्वे स्टेशन मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट मास्तर यांना पत्र देण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मुस्लीम आरक्षण समितीच्या पदाधिकारी यांच्यासह मुस्लीम महिला-पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.

मुस्लीम आरक्षण संघर्ष समनव्य समितीतर्फे विविध आंदोलन

याआधी मुस्लीम आरक्षण संघर्ष समनव्य समितीतर्फे विविध आंदोलन करण्यात आले. त्यात लोकप्रतिनिधीना घेराव, प्रांत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे यासह सामूहिक निवेदन देणे या प्रकारे आंदोलन करण्यात आले. आजही 36 जिल्हे 36 दिवस आंदोलन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details