नाशिक -देवळाली कॅम्प परिसरातील मिलिटरी हद्दीत लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दारणा काठच्या गावांतील हा सहावा बिबट्या आहे. देवळाली कॅम्प परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्यांचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. नागरिकांच्या मागणीप्रमाणे जवान क्वार्टर, आर्टीसेंटर देवळाली येथे तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. बुधवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यामध्ये कैद झाला होता.
दारणा नदीकाठच्या परिसरात दहशत निर्माण करणारा सहावा बिबट्या जेरबंद - nashik lepord stranded
दारणा काठच्या गावात दहशत माजविणाऱ्या बिबट्यांपैकी आतापर्यंत सहा बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तरिही परिसरात बिबट्यांचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण आहे.
मिलिटरी अधिकाऱ्यांना पिंजऱ्याचा दरवाजा बंद झालेला दिसल्यानंतर बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री झाली. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. नाशिक वनविभागाचे परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी व पथकाने पिंजरा ताब्यात घेत गंगापूर येथील रोपवाटीकेत नेण्यात आला आहे.
दरम्यान, दारणा काठच्या गावात दहशत माजविणाऱ्या बिबट्यांपैकी आतापर्यंत सहा बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तरिही परिसरात बिबट्यांचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण आहे. पकडलेला बिबट्या नर असून दहा ते बारा वर्षाचा आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी करण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले. दारणा नदी नदीकाठच्या परिसरात सहा बिबटे जेरबंद झाले असले तरी या परिसरात अजून काही बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान बालकांचा आणि वयोरूध्द नागरिकाचा बिबट्याने बळी घेतला आहे.