महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरीत बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Nashik latest news

मातेरेवाडी येथील अतुल शिवाजी खराटे यांच्या शेतात हा बिबट्या दिसला. त्यामुळे नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

दिंडोरीत बिबट्याचा मुक्त संचार

By

Published : Nov 23, 2019, 7:33 AM IST

नाशिक- दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना ते मातेरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या द्राक्ष बागेत बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरातातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मातेरेवाडी येथील अतुल शिवाजी खराटे यांच्या शेतात हा बिबट्या दिसला. त्यामुळे नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - नाशिकचे महापौर पद भाजपकडे, गिरीश महाजन पुन्हा ठरले संकटमोचक

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या वसाहतीपासून मातेरेवाडी या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. तसेच या रस्त्याने शिक्षणासाठी जोपूळ, राजापूर, धामणवाडी, जवुळके वणी, येथील विद्यार्थी ये-जा करत असतात. त्यामुळे आज हा बिबट्या आढळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरणा आहे. बिबट्या आढळल्यानंतर मातेरेवाडीचे पोलीस पाटील शिवाजी रघुनाथ खराटे यांनी सर्व घाबरलेल्या विद्यार्थ्यांनासोबत घेऊन रस्ता पास करून दिला.

हेही वाचा -संकटमोचकांच्या पक्षातच संकट? महापौर निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details