नाशिक - कसारा घाट परिसरातील रेल्वे रुळाजवळ मुक्त संचार करताना बिबट्या आढळला आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या भागात बिबट्याचा वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिकच्या कसारा घाट परिसरात आढळला बिबट्या - Nashik Highway
नाशिकच्या कसारा घाट परिसरातील रेल्वे रुळाजवळील बोगदा नंबर ३ येथे बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. इगतपूरी, घोटी या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे या अधीसुद्धा दिसून आले आहे.

नाशिकच्या कसारा घाट परिसरातील रेल्वे रुळाजवळील बोगदा नंबर ३ येथे या बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. इगतपूरी, घोटी या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे या अधीसुद्धा दिसून आले आहे. अनेक वेळा मुंबई- नाशिक महामार्गवर बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. येथील काही भाग हा वन विभागाचा असून जंगल असल्याने बिबट्यांप्रमाणे इतरही प्राण्यांचा या ठिकाणी वावर असतो. अनेक वेळा पाणी आणि भक्ष्याच्या शोधत बिबटे जंगल सोडून मानवी वस्तीकडे येतात.
वन विभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात १०० हुन अधिक बिबटे असल्याचे समोर आले आहे. यात उसाचे शेत असलेल्या निफाड, दिंडोरी, इगतपूरी, घोटी, पेठ सुरगाणा तसेच नाशिक शहराच्या आजूबाजूच्या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.